बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप
बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत
दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते
नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता
कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली
संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे
कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले
सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे
प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला
तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा